दि.१५ मे: केवळ मुलींना फ्रेंड रिक्वेस्ट पाठवली म्हणून जेलमध्ये पाठवणार??, असा प्रश्न तुम्हाला पडणे साहजिकच आहे.काय विश्वास नाही बसत?? पण अहो हेच सत्य आहे.एखाद्या तरूणीला सलग तिस-यांदा रिक्वेस्ट पाठविणे आता चांगलेच महागात पडू शकते.
फेसबुकवर अनेकदा सुंदर छायाचित्र पाहून, मुलींची खाती आहेत हे बघून किंवा सामाईक असणारे फ्रेंड्स लक्षात घेऊन आपली काहीही ओळखपाळख नसताना असंख्य तरूंणीना सातत्याने फ्रेंडरिक्वेस्ट येत असतात.त्यांना रिजेक्ट केले तरीही त्या पुन:पुन्हा येतच असतात.अशा वेळेस त्या व्यक्तीला ब्लॉक करण्यावाचून दुसरा पर्याय तरूंणींसमोर उपलब्धच नसतो.परंतू या सर्व नित्यनियमाने सुरूच राहणा-या घटनांमुळे तरूंणींना प्रचंड मानसिक त्रासाला बळी पडावे लागते.
त्यामुळे असे फेसबुकच्या माध्यमातून मुलीला वारंवार फ्रेंड रिक्वेस्ट पाठवून त्रास देणे बेकायदेशीर असल्याचे उत्तरप्रदेशच्या पोलिसांनी सांगितले आहे. याबाबत उत्तर प्रदेशच्या पोलिसांनी सर्व पोलीस ठाण्यांना एक परिपत्रक पाठविले असून आता फेसबुकवरील हालचालींवर सर्व पोलीस ठाण्यांतील पोलिसांची काकदृष्टीच असणार आहे.या परिपत्रकात असे नमूद करण्यात आले आहे की,'जर तिस-यांदा फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याचा गुन्हा सिद्ध झाला तर गुन्हेगाराला सुमारे ५ लाख रूपयांचा दंड आणि ३ वर्षांचा तुरूंगवास इतकी कठोर शिक्षा करण्यात येईल'.
तेव्हा इथूनपुढे तरूंणीना फ्रेंड रिक्वेस्ट पाठविण्याअगोदर विचार नक्कीच करा..
- प्रतिमा कांबळे .

No comments:
Post a Comment