काय बातमी वाचून विश्वास नाही बसत?? खोटं वाटतंय?? अहो पण हे खरंच आहे.आपला सगळ्यांचा आवडता बॉलिवुड स्टार सल्लुमिया आता बांधला जाणार आहे लग्नाच्या बेडीत !! मिड-डे या इंग्रजी वृत्तपत्राच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध झालेल्या वृत्तानुसार सलमान खानच्या आयुष्यात एक सोनेरी केसांची तरूणी आली आहे. ही तरूणी म्हणजे रोमानियन टिव्ही कलाकार आणि सूत्रसंचालक लूलीआ वांतूर ही आहे.सलमान आणि लूलीआ गेले काही दिवस दररोज वांद्र्यामधील एका पंचतारांकीत हॉटेलमध्ये एकत्र बसलेले आढळून आलेले आहेत.
भलेही सलमानचे नाव या अगोदर ब-याच तारकांबरोबर जोडले गेलेले आहे.परंतू ताज्या बातमीनुसार सलमान खान आपल्या या नात्याबद्दल प्रचंड गंभीर असून त्याला हे नाते लग्नामध्ये वळवायचेच आहे.
आता आपण या बाबतीत काही निश्चित ठरवू शकत नसलो तरी एवढेच म्हणू शकतो की, "आगे आगे देखो होता है क्या..."
No comments:
Post a Comment