आपल्या आयुष्यात आपल्या करीअरसाठी महत्त्वाच्या
मानल्या जाणा-या परीक्षांच्या पेपर्समध्ये मुंबई विद्यापीठाने घोळ घालणे
आणि असंख्य विद्यार्थ्यांचा जीव वेशीला टांगणे हे आता आपल्याला नित्याचेच
झाले असताना सोमवार दि.६ मे २०१३ रोजी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी
सेनेने मुंबई विद्यापीठाचीच मनसे परीक्षा घेतली.
एमए,एलएलबी,बीकॉम,बीए अशा महत्त्वाच्या परीक्षांच्या पेपर्समध्ये सातत्याने होणा-या
चुका, विद्यार्थ्यांच्या तक्रारींना दाद न देणे,चूक करणा-या प्राध्यापकांना
पोटात घेणे अशा असंख्य घटनांचा निषेध म्हणून मनविसेने हे अनोखे आंदोलन
केले.विद्यापीठाच्या गेटसमोरच काही विद्यार्थ्यांना परीक्षार्थी म्हणून
बसविले आणि त्यांची प्रतिकात्मक परीक्षा घेतली.
मनविसे अध्यक्ष
आदित्य शिरोडकर आणि सदस्य सुधाकर तांबोळी यांच्या नेतृत्वाखाली
कार्यकर्त्यांनी मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा नियंत्रकाच्या कार्यालयास
घेराव घातला.मनविसेच्या शिष्ट मंडळाने प्र-कुलगुरू डॉ.नरेशचंद्र,प्रभारी
परीक्षा नियंत्रक दीपक वसावे,नवनियुक्त परीक्षा नियंत्रक पद्मा देशमुख आणि
वाणिज्य विभागाचे अधिष्ठाता डॉ.मधु नायर यांच्याशी या आंदोलनाची दखल
घेण्यासंदर्भात चर्चा केली.विद्यापीठाच्या प्रशासन मंडळाने ह्या मागण्या
मान्य करून अपेक्षित सुधारणा केल्या जातील अशी खात्री दर्शविली आहे.
No comments:
Post a Comment