मुंबईत नुकत्याच झालेल्या २६/११ सारख्या भयानक दहशतवादी हल्ल्याला लोक विसरलेले नसतानाच पुन्हा २६/११ घडण्याची भिती घेऊन आपल्याला जगावे लागणार आहे..
अल जिहाद या दहशतवादी संघटनेने येत्या २१ जुलै २०१३ रोजी भारतातील अमेरिकेच्या सरकारी इमारती आणि अधिकारी यांना लक्ष्य करण्याचे धमकीवजा पत्र कोलकाता येथील अमेरिकेच्या दुतावासाच्या कार्यालयाला पाठवलेले आहे.तसेच त्यांनी हैदराबाद,बेंगरूळ आणि मुंबईतील महत्त्वाची सार्वजनिक ठिकाणे,रेल्वे स्टेशन यांनाही लक्ष्य करण्याची धमकी त्या पत्राद्वारे दिलेली आहे.
अल जिहाद या संघटनेसंबंधी गुप्तचर यंत्रणेकडे कोणतीही माहिती नसल्याचे समजले आहे.हा संभाव्य हल्ला रोखण्यासाठी नौदळाच्या पश्चिम तळाने अलर्ट दिला आहे.मुंबई पोलिसांनाही अलर्ट देण्यात आले आहे.राष्ट्रीय तपास संस्था आणि विविध राज्यांच्या सुरक्षा यंत्रणा हा हल्ला रोखण्यासाठी सज्ज झाल्या आहेत..
No comments:
Post a Comment