Wednesday, 28 November 2012

बी.ए़ड कृतीसंशोधन प्रकल्प ' आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणे - एक अभ्यास ' (भाग १)


नमस्कार,

मी सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमुं.१ येथून बी.ए़ड अभ्यासक्रम (२०११-१२) शिकत असताना आम्हाला अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या आवडीच्या एका विषयावर कृतीसंशोधन प्रकल्प करणे अनिवार्य असे. त्य़ामुळे मी   आंतरजालावर   उपलब्ध   असलेल्या   मराठी  संकेतस्थळांचा आढावा घेणे -  एक अभ्यास  ' ह्या माझ्या आवडत्या  विषयावर केलेला कृतीसंशोधन प्रकल्प इथे देत आहे.








अनुक्रमणिका
                              




प्रकरण 

प्रस्तावना


भाषा शब्द भाषया धातूपासून बनलेला आहे. ‘भाषयाचा मूळ अर्थ बोलणे. मनुष्य स्वत:चे भाव, विचार भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो.


भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राष्ट्राची एक प्रमुख भाषा किंवा मातृभाषा असते. तशीच महाराष्ट्राची प्रमुख भाषा, मातृभाषा ही मराठी आहे.


मराठी भाषा विविधांगी पैलूंनी नटलेली आहे. तिला समृद्ध संस्कृती, साहित्य  वाड्मयाची जोड आहे. म्हणून मराठी भाषा इतर भाषांपेक्षा आपले वेगळपण दाखवते. महाराष्ट्रात मराठी भाषा ही लोकांच्या आत्मनिवेदनाचे तसेच बौद्धिक, भावनिक, सामाजिकसाहित्यिक, अध्यात्मिक विकासाचे म्हणजेच सर्वंगीण विकासाचे साधन म्हणून कार्य करते.


२१ व्या शतकात आधुनिकीकरणमुळे समाजात अनेक बदल घडून आले आहेत. मानवाने विज्ञान - तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप मोठी प्रगती साधली आहे आणि साधतच राहणार आहे.


अशा वेळेस थोर परंपरांनी समृद्ध असलेल्या आपल्या मराठी भाषेचा आंतरजालावर किती प्रमाणात वापर होतो आहे?, किती मराठी संकेतस्थळे आज आंतरजालावर उपलब्ध आहेत आणि त्यांचा मराठी इतर विषयांच्या अध्यापनामध्ये आपण एक संदर्भ साधन म्हणून कसा वापर करू शकतो?, याचा अभ्यास करण्यासाठी मी हा विषय निवडला आहे.



गरज

सुरुवातीला मी मराठी भाषा अध्यापनामध्ये मराठी संकेतस्थळांचा वापर - एक अभ्यास असा विषय निवडला होता. पण डी.एल.पी ची सोय असलेल्या काही शाळांमध्येसुद्धा मराठी संकेतस्थळांचा एक संदर्भ साधन म्हणून अध्यापनात वापर करण्याचा विचार अजूनही सर्रास रुढ झालेला नाही आहे. याचशा मराठी अध्यापकांना संगणकाचे, आंतरजालाचे ज्ञान नाही. ते जाणून घेऊन - शिकून घेऊन  त्याचा अध्यापनात वापर करण्याची सवड नाही आणि आवड तर नाहीच नाही, असे मी काही शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर मला जाणवले.


बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीचे कंटाळवाणे अध्यापनच केले जात आहे. मराठीच्या तुलनेत इतर विषयाच्या निमेटेड सी.डी., डी.वि.डी. सुद्धा उपलब्ध आहेत. पण मराठी विषयाला या दृश्राव्य अनुभूतिंचा स्पर्शही झालेला दिसत नाही आहे. आणि म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा असून पालकांना-विद्यार्थ्यांना तिचा अभिमान नाही. विद्यार्थ्यांना आपल्याच मराठी मातृभाषेतून सुंदर पत्र, निबंध लिहिता येत नाहीत. मराठी विषयात कमी गुण मिळतात. शुद्धलेखन लिहायला देऊनही असंख्य मराठी व्याकरणिक चूका केलेल्या दिसतात. 'ना आपले बोलणे शुद्ध, ना आपले लिहिणे शुद्ध !' अशी खेदजन्य परिस्थिती मराठीच्या वाट्याला आलेली आहे. आणि त्यामुळे आज आपल्या मराठी माणसाचा सर्वांगीण विकास घडणे आणि घडवणे ही अशक्यप्राय: वस्तुस्थिती बनलेली आहे.


आंतरजालावर मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना, मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून मराठी भाषा मराठी संस्कृती जगभर पोहोचलेली असताना त्यांचा मराठी इतर विषय अध्यापनात वापर होत नाही ही खूपच चूकीची शरमेची बाब आहे. मग अशावेळेस एडगर डेल यांनी सांगितलेल्या दृश्राव्य अनुभूतींना काय महत्त्व उरते?

      
आंतरजालावर अलिबाबाच्या गुहेप्रमाणे असंख्यविविध आणि समृद्ध अशा मराठी संकेतस्थळांचा खजिनाच दडलेला आहे. त्याची माहिती आपल्याला व्हावी, मराठी बरोबरच इतर विषयांच्या अध्यापनात त्यांचा वापर केला जावा आणि एडगर डेल यांनी सांगितल्याप्रमाणे दृ-श्राव्य अनुभूती देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया -या अर्थाने अधिक रुचिपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक व्हावी यासाठी या प्रकल्पाची गरज भासते.



समस्येचे     विधान

१)  स्थूल समस्या

मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणे.

) निश्चित समस्या
'आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेत स्थळांचा आढावा घेणे - एक अभ्यास.'


महत्त्व

ü    मराठी  भाषेविषयी  लोकांना  प्रेम  वाटावे.

ü    मराठी   भाषेची  आवड   निर्माण   व्हावी.

ü    मराठी  भाषेचे  महत्त्व  सर्वांना  ळावे.

ü    मराठी   भाषेबद्दल   सखोल  ज्ञान   प्राप्त  व्हावे.

ü    आंतरजालावरील    मराठी   संकेतस्थळांचा  अध्यापनात वापर केला  जावा.

ü    विद्यार्थ्यांना  या  मराठी  संकेतस्थळांवरील  ज्ञानाचा  खजिना   मनमुराद  लुटता  यावा.

ü    विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, प्रतिभा जागृत होऊन मराठी साहित्यविश्वात त्यांनी मोलाची भर घालावी.

ü    स्वत:चा सर्वांगीण विकास साधता-साधताच मराठी भाषेचे संपूर्ण जगभरात एक अढळ स्थान निर्माण करण्यास मदत करावी.

अशाप्रकारे ह्या प्रकल्पाचे महत्त्व मला वाटते.


उद्दिष्टे

  • आंतरजालावरील उपलब्ध मराठी संकेतस्थळांचे ज्ञान मिळवण्यासाठी  मदत  करणे.
  • एक संदर्भ साधन म्हणून आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांचा   अध्यापनात   वापर  करण्यासाठी मदत करणे.
  • एडगर  डेल यांनी सांगितल्याप्रमाणे  दृश्राव्य अनुभूती देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया परिणामकारक बनविण्यासाठी  मदत  करणे.

गृहितके

  •  मराठीचे  आपल्या  जीवनातील महत्त्व, गरज फायदे कोणते आहेत हे पटवून दिले तर निश्चितच मराठीविषयीचा  दृष्टिकोण  सकारात्मक  होईल.   
  •  मराठी  भाषेविषयी  आस्था, प्रेम  उत्पन्न होईल.
  • मराठी    इतर  विषय  अध्यापनात  मराठी  संकेतस्थळांचा   वापर   केला   जाईल.
  •  पालक शिक्षक विद्यार्थी  यांना  आंतरजालावरील मराठी  संकेतस्थळांचे  ज्ञान  होऊन   त्यांचा  सर्वांगीण  विकास साधला  जाईल.


व्याप्ती   व    मर्यादा

व्याप्ती

महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा बोलली जाते कारण महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण जगामधे आंतरजालावर आणि   संगणकीय  क्षेत्रात  मराठीचा   वापर   मोठ्या  प्रमाणावर केला   जात  आहे.

अशाप्रकारे  मराठी   भाषेची  व्याप्ती  ही  फार  मोठी आहे.

मर्यादा

हा प्रकल्प सर्वच स्तरावरील मराठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना   पालकांना    प्रत्येक   मराठी   माणसाला उपयुक्त  आहे.

एकंदरीतच   मराठी  भाषेविषयी    अभिरुची    आणि    प्रेम  असणा-या   सर्वांसाठी   आहे.



प्रकरण 
प्रकल्पाची कार्यवाही

वापरलेली पद्धत

संशोधन
   
व्याख्या


  • रेड्मन  :  नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेला  सुव्यवस्थित  प्रयत्न म्हणजे संशोधन.


  • वेबस्टन :  संशोधन म्हणजे तथ्येत्त्वे शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा होय.


  • मौले   : समस्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने कुशलतेने उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन होय.

संशोधनाचे हेतू 


  • समस्येचे उत्तर शोधणे.

  • संशोधन हे तर्कसंगत वस्तुनिष्ठ असून जमा केलेल्या सामग्रीचा पड़ताळा चाचणी करून पाहिला जातो.

  • प्रमाणित साधनांचा वापर होतो.
  • संशोधनामध्ये असलेली माहिती संख्यात्मक स्वरूपात मिते.
  •  निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो.



संशोधनाचे प्रकार

संशोधन

  • मूलभूत संशोधन : - ज्ञान प्राप्तीसाठी प्राप्त केले जाते.  उदा.न्यूटनचा सिद्धांत

  • उपयोजित संशोधन : - समस्येची ताबडतोब उत्तरे शोधणेउदा.२६ जुलैला पाऊस  का पडला? याची कारणे.

  • कृती संशोधन    : - शिक्षकाला आपले जीवन व्यतीत करत असताना अनेक समस्या निर्माण होतात(उदा. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबतीत ) याचे निराकरण याद्वारे केले जाते.

संशोधन पद्धती

* संशोधनाच्या पद्धती खालीलप्रमाणे *


ऐतिहासिक पद्धती

सर्वेक्षण पद्धती
         
प्रायोगिक पद्धती
                       
व्यक्ती अभ्यास पद्धती
                      
वैकासिक पद्धती
                      
)  कारणमिमांसा पद्धती
                       
समवाय पद्धती

* यांपैकी पहिल्या तीन पद्धती संशोधनाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. *




ऐतिहासिक पद्धती

शिक्षणामधील विविध वर्तमान समस्यांच्या निराकरणासाठी त्यांची पार्श्वभूमी स्पष्ट होण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक संशोधन महत्त्वाचे आहेऐतिहासिक घटना किंवा सध्याच्या साधनांची भूतकाळातील चौकशी करण्यासाठी ऐतिहासिक पद्धती वापरतात.

सर्वेक्षण पद्धती

सध्याची स्थिती छोटया नमुन्यावरून शोधण्यासाठी सर्वेक्षण संशोधन वापरतात.

प्रायोगिक पद्धती

कार्यकारण संबंध दर्शविणा-या गृहीतकांचे खरेखुरे परिक्षण करण्याची एकमेव पद्धती म्हणजे प्रायोगिक पद्धती होयही भविष्यात रमणाऱी शास्त्रीय पद्धती आहे. त्यामध्ये संशोधक नैसर्गिक गोष्टींवरून किंवा स्वत: प्रयोग करून आवश्यक ती माहिती उपलब्ध करतो.





निवडलेली पद्धती

सर्वेक्षण  पद्धती 

  
(ऐतिहासिक पद्धतीने भूतकालीन गोष्टींविषयी माहिती गोळा करण्यात येत असल्याने वर्णनात्मक आणि जमा केलेल्या सर्व साहित्याची आपोआप स्वीकृती करता येत नाहीसंशोधन हे भूतकाळात उपस्थित नसल्यामुळे संकलित साहित्याच्या स्वीकृतीबाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टींची दखल घ्यावी लागते.)

  
सर्वेक्षण संशोधनात संशोधकास माहिती कोठून उपलब्ध झाली ते जातीने माहित असल्यामुळे त्याच्या मान्यतेविषयी विश्वसनीयतेबाबत आणि सप्रमाणता मान्य करण्यास अडचणी नसतातत्याबाबत शंका आल्यास ताबडतोब निरसन करून घेण्याची शक्यता असते.


सदर प्रकल्पासाठी संशोधिकेने सर्वेक्षण पद्धती वापरली आहेया सर्वेक्षणात आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेऊन त्यामधील समस्यांचा उहापोह केला आहेम्हणून ही माहिती या सर्वेक्षणाअंतर्गत विश्वसनीय आहे.


सर्वेक्षण  पद्धती 
( सविस्तर माहिती )

' सर्वेक्षण पद्धती ' ही आदर्शमूलक सर्वेक्षण स्तर आणि वर्णनात्मक पद्धती अशा विविध नावांनी प्रचलित आहे. "सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण मुल्यांकन होय."

      
विविध क्षेत्रांतील वर्तमान स्थितीचा अंदाज घेणेसंस्था नियोजनाकरिता आवश्यक ती माहिती गोळा करणे आणि उच्च संशोधनात समस्येची उकल करण्याकरिता आवश्यक असलेली वर्तमान स्थिती समजू घेणेयासाठी सर्वेक्षण केले जाते.


सर्वेक्षणातून ) वर्तमान स्थिती, ) अपेक्षित स्थिती, ) आवश्यक संशोधनाचा बोध अशा तीन प्रकारची माहिती संकलित केली जाते. 



सर्वेक्षणाचा हेतू


सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू विभिन्न क्षेत्रांतील वर्तमान स्थितीचा बोध घेणे हा आहेयातून होणा-या प्राप्त तथ्यांचे मुल्यांकन अधिक चांगल्या बदलाकरिता मार्गदर्शन करते. अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले सर्वेक्षण निव्व प्रचलित अभ्यासक्रमात आढळून येणारे गुण-दोष पाहून थांबत नाही तर त्यात सुधारणाही सुचविते.

संशोधन कर्त्याला अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने संशोधन करून समस्येची उकल करण्याकरिता लागणारी परिस्थिती समजू घेण्यासाठी प्रारंभिक पायरी म्हणून सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. प्रयोगाची आखणी अंमलबजावणी करण्यासाठी आधारभूत असलेल्या वर्तमान परिस्थितीचे सत्य आकलन यामुळे संशोधकाला होते.प्राप्त होण्यासारख्या पुराव्यांच्या आधारे समस्येची उकल होऊ शकते की नाही हे ते.

विविध  शालेय उपक्रमांचे नियोजन करण्यात सर्वेक्षणाची मदत होतेसर्वेक्षणामुळे विकासाची कोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत ते ते.



नमुना निवड

पद्धती आणि तंत्र विकसित करताना संशोधकाला उपयुक्त पडेल असा नमुना ठरविणे आवश्यक असते. कोणत्याही सर्वेक्षण पद्धतीच्या समस्यांचा शोध घेताना एक प्रातिनिधिक नमुना निवडावा लागतो.

व्याख्या :
संशोधनाची तत्त्वे पद्धती विकसित करताना आवश्यक असा उचित नमुना गट ठरविण्याच्या पद्धतीला नमुना निवड असे म्हणतात.

* या प्रकल्पाकरिता संशोधिकेने आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा नमुना म्हणून निवड केली  या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेऊन हा प्रकल्प तयार करण्यात आला. *








       

















      















                                                                  







                                                            




No comments:

Post a Comment