काही बोलायाचे आहे.....
ही
गोष्ट मी F.Y.B.A.त असतानाची आहे.
आमच्या history
च्या ma'am खूप कड़क होत्या.त्यांचे lecture
बुडवणे
म्हणजे घोर पापं!
त्या समोर पुस्तक न घेता शिकवत
तसेच त्यांचे वर्गात बारीक़ लक्ष असे. साहजिकच मस्तीखोर-टवाळक्या करणारी मुले-मुली mam च्या डोक्यात जात असायचे. वर्गात
एक सुस्वरूप मुलगी होती. काळीसावळीच पण नाकीडोळी नीटस अशी. पण बिचारीच्या डोक्यात
कांदेबटाटे भरलेले होते.
आमच्या जेव्हा करीयरवर किंवा
सद्य परिस्थितीवर चर्चा चालू असत तेव्हा ती नेहेमी म्हणायची,"
मी तर
बाबा लग्न करणार. आमच्या अख्ख्या खानदानात कधी कुण्या बाईने नोकरी नाही केली".
मुंबईतल्या २१ व्या शतकातील एका 'स्त्री' चे हे बोलणे ऐकून आम्ही मुली आश्चर्यचकीत व्हायचो. आम्ही
तिला खूप समजवायचो पण पालथ्या घड्यावर पाणी! मी तर तिला म्हणायचे,"
तुला
अस सांगायला काय अभिमान वाटतो?" पण तिला त्याचे काहीच वाटायचे
नाही ! आम्हाला वाटलं की, आम्ही हिचं 'brain
washing' करू पण
काही जमलंच नाही.
एके
दिवशी history च्या ma'am हिला उत्तर देता आले नाही म्हणून खूप रागावल्या. तेव्हा पासून
पोरगी
वर्गात यायची बंद झाली. वार्षिक परीक्षा झाल्या. ही history
त व अजून २ विषयांत नापास झाली.
आमचे S.Y.B.A. सुरु झाले आणि समजले की तिचे
गावी लग्न झाले. लग्नानंतर ती आम्हाला भेटायला आली अर्थात आम्हाला कोणालाच हे
बरे वाटले नव्हते. history च्या ma'am छान दिसत.
घा-या डोळ्यांच्या गो-यागो-या. ती ma'am ना भेटायला गेली. त्यांनाही खूप वाईट वाटले.
घा-या डोळ्यांच्या गो-यागो-या. ती ma'am ना भेटायला गेली. त्यांनाही खूप वाईट वाटले.
त्या
म्हणाल्या,"तू वाटोळं करून घेतलंस. आता plz लवकर मुलाला जन्म नको
देऊस."
आम्हाला
बरे वाटले कारण आम्हाला जे बोलायचे होते ते ma'am
नी
तिला सांगितले होते. तर यावर ह्या शहाणीचे म्हणणे काय?
"अशी म्हणालीस काय? थांब पुढच्याच वर्षी हिच्या
हातात मूल ठेवते की नाही ते बघ".
आणि खरच ती वर्षभरात एका
मुलाची आई झालीही आणि त्याचे तिला काहीच वाटत नाही. शिक्षणाला तर राम-राम केलाच आहे
आता गावी सासूची लाडकी झाली आहे. सासू आपला सासूपणा दाखवते पण ही काहीच बोलत नाही. 'जाऊदे मोठी आहे उलटं बोलायच
नाही',मग ती
सासूला आवडते.
आम्ही मात्र शिकतोय कारण आम्हाला आमचा 'माणसां'चा जन्म सार्थकी लावायचा आहे. नुस्तंच जन्माला येउन मरायचं नाहीए. पण 'तिचे काय?' हा प्रश्न नेहेमी काळजाला अस्वस्थ करत असतो. कारण प्रश्न तिच्यापुरता मर्यादित नाही हा प्रश्न आजही अशीच परिस्थिती असलेल्या इतर बहुसंख्य मुलींचा - त्यांच्या पालकांचा - त्यांनी जन्म दिलेल्या पुढच्या पिढीचा - समाजाचा आणि देशाच्या भवितव्याचा आहे.

No comments:
Post a Comment