एक
क्षणकथा
मरणाचा आनंद झालाय. अगदी
शब्दशः मरणार
आहे मी. थर्ड स्टेजचा कॅन्सर ! कोण वाचतो? आधी लक्षात आलाच नाही. काही फरक
पडत नाही. जीवनभर मरणाची वाट बघत थांबलो होतो.
छ्या! दुःख
नाही, वेदना
नाही, यातना
नाही की शोकांतिका नाही जीवघेणी! स्वर्ग सुखात होतो. प्रसिद्ध होतो.
नामांकित होतो.
श्रीमंत होतो.
फॅमिली लाईफ? एकदम
सेवन स्टार!
मग काय? नंबर वन पत्रकार होतो.
स्वदेशातीलच काय विदेशातीलही महान नेत्यांच्या, कलाकारांच्य़ा, अगदी
नोबेल पारितोषिक प्राप्तांच्याही मुलाखती घेतलेल्या मी! इंटरनॅशनल पर्सनॅलिटी!
आता काय
प्रॉब्लेम? प्रॉब्लेम? काहीच नाही! फक्त एक
स्वप्न! इतिहासांतील ग्रेट माणसांच्या मुलाखती घ्यायच्या! त्यासाठी मरायला हवं. ते आता
होणारच होतं. स्वप्न
पूर्ण होणार
होतं. फक्त एक
शंका घोळतेय. ते सगळेच थोडे आता भेटणार? पुनर्जन्म कित्ती झाले असतील! कमीत कमी एक झाला असला तरी ओफंस
व्हायचं.
एक आशावाद! पुनर्जन्म झाला
असला किंवा झाले
असले तरी प्रत्येकाची व प्रत्येकीची एक तरी
झेरॉक्स कॉपी स्वर्गात (किंवा
नरकात) ठेवत असतील की नाही!
- प्रा.सुधाकर
कौशिक
( धनंजय दिवाळीअंक २०१२ मधील एक क्षणकथा )
- प्रतिमा ह. कांबळे
( धनंजय दिवाळीअंक २०१२ मधील एक क्षणकथा )
- प्रतिमा ह. कांबळे
No comments:
Post a Comment