मराठी भाषेची उत्क्रांती
प्रस्तावना : -
एखाद्या भाषेच्या अस्तित्वाविषयीचे पुरावे उपलब्ध झाल्यानंतर तिचे कुलदृष्टया वर्गीकरण करण्याचा प्रयत्न भाषा वैज्ञानिक करत असतात.जगातील बहुसंख्य भाषांचे कुलनिष्ठ वर्गीकरण केले गेले आहे. काही प्रमुख भाषाकुळे पुढीलप्रमाणे
सांगता येतील व त्यावरून मराठीची उत्क्रांती कशी झाली ते समजते.
* भारतामध्ये प्रामुख्याने तीन भाषाकुळातील भाषा बोलल्या जातात. *
- इंडो-युरोपियन भाषाकुळ
मराठी, गुजराथी, हिंदी इ. भाषांचा समावेश इंडो-युरोपियन भाषाकुळामध्ये होतो. युरोपातील व उत्तर भारतातील भाषांचा समावेश यात होतो.
- द्राविडी भाषाकुळ
तमिळ, तेलगु, मल्यालम, कानडी इ. भाषांचा समावेश यात होतो.
- ओस्ट्रो-एशियाई
मुंडाशाखेतील बिहार प्रांतामध्ये बोलली जाणारी मुंडारी भाषा, बिहार व पश्चिम बंगाल मधील संताळी भाषा, मेघालयातील खासी भाषा इ. भाषांचा समावेश यात होतो.
मराठी वाड.मयाचा आरंभकाळ
साधारणपणे ४ थ्या, ५ व्या शतकात मराठी भाषा विकसित झाली. त्या काळातील विविध भाषांतील ग्रंथांतून मराठी भाषेचे उल्लेख सापडतात. म्हणजेच मराठी त्या काळात बोलली जाणारी भाषा होती.
१० व्या शतकात म्हणजेच इ.स.९८३ मध्ये कर्नाटकातील श्रवणबेळगोळ येथे जैन धर्मीय बाहुबली यांच्या मूर्तीखाली 'श्री.चामुंड राये करवियले'हे वाक्य सापडले. या नंतर १२ व्या शतकात विवेक सिंधू मुकुंद राजांचा व मराठी साहित्याचा जो झरा वाहू लागला तो आजही वाहत आहे.
१२ व्या शतकात नाथ पंथीय मुकुंदराज यांनी विवेक सिंधू हा ग्रंथ रचून आद्यग्रंथकार होण्याचा मान पटकावला. त्या नंतर महानुभाव साहित्य, संत, पंत, तंत यांनी मराठी वाड.मयात मोलाची भर घातली. आधुनिक साहित्याचे प्रवाह कादंबरी, नाटक, कथा, काव्य, आत्मचरित्र, नियतकालिके, निबंध, वाड.मय यांनी मराठी साहित्याचा झरा निरंतर वाहत ठेवला आहे. इतकी ही मराठी माऊली समृद्ध आहे. अशी ही मराठी भाषा महाराष्ट्राची मातृभाषा आहे.
* मातृभाषा व तिचे महत्त्व पुढीलप्रमाणे स्पष्ट केले आहे. *
मातृभाषेचा अर्थ व मातृभाषेचे महत्त्व
अर्थ
:-
मातृभाषा म्हणजेच आईची भाषा. ब-याच
व्यक्तिंची
आईची
भाषा
आणि
मातृभाषा
एकच
असते. परंतु काहींच्या बाबतीत या दोन भाषा वेगळ्या असण्याची शक्यता असते. मातृभाषा याचा अर्थ बालक जन्माला आल्यावर त्याच्या घरी ज्या भाषेचे संस्कार सर्वात प्रथम होतात,ती भाषा होय." अशा रितीने प्रयुक्त भाषा बालक विनासायास ऐकून व अनुकरणाने शिकतो व त्याच भाषेत विचार करू लागतो.
महत्त्व :-
भाषा केवळ विचार, भावना व अनुभवाच्या आदानप्रदानाचे साधन नसून ते बौद्धिक, भावनिक व कार्यात्मक व्यक्ती विकासाचे साधन आहे, तसेच ते वाड.मयीन आवड व अभिरुची निर्माण करण्याचेही साधन आहे. मातृभाषेमुळे कला, संगीत, साहित्य, संस्कृती, ज्ञान, विवेक, सौंदर्य, आचारविचार इ. चा विकास करू शकतो. तसेच मातृभाषा सामाजिकता, सामाजिक ऐक्य वा सामाजिक एकरूपता प्राप्त करण्याचेही साधन आहे.
मानवाला विचारशील, बुद्धिमान, सामाजिक आणि सुसंस्कृत प्राणी बनवण्याची शक्ती त्याच्या मातृभाषेमध्येच आहे.
मराठी संकेतस्थळे
नमस्कार,
मराठी वाचक विविधता असलेल्या लेखांकरता आतुरतेने दिवाळी अंकाची वाट पाहत असे, पण हळूहळू नवनवीन बदल झाले व युनिकोडचा शोध लागला, मायबोलीने एका विदेशी भाषेने भरलेल्या, दाटीवाटी असलेल्या जंगलात, एक मराठीचे रोपटे लावले व हळूहळू मराठी भाषेचे बीज चांगलेच फोफावले. प्रत्येकाच्या मनात दडून बसलेला लेखक ह्या युनिकोडचा आधार घेऊन आपली लेखणी पाजळू लागला, व त्यांची ही भूक पूर्ण करण्यासाठी नवनवीन मराठी संकेतस्थळे निर्माण होत गेली, काही रुजली, काही फोफावली तर काही काळाच्या ओघात वाळून बेचिराख झाली, पण जी बेचिराख झाली त्यांनी देखील जाता जाता, नवीन रोपट्यांना खतं म्हणून आपल्या संकल्पना दिल्या. व जे रुजले होते, त्यांनी माय मराठीची सेवा, जिवापाड केली.
२००५ ते २०१० ह्या कालावधीत समुदाय संकेतस्थळांचे रोपटे वाढून वटवृक्षामध्ये रुपांतर झाले. पण हा वटवृक्ष फुलला-फळला व मराठी वाचकांची भूक सक्षमपणे भागवू लागला त्यासाठी अजून एक समुदाय कारणीभूत होता. “ब्लॉगर्स” मराठी ब्लॉगर्स ! सध्या मराठीमध्ये हजारो ब्लॉग आहेत, ह्यावर एक वेगळाच लेख होईल.
आपण मराठी संकेतस्थळांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ.
मराठी संकेतस्थळांचा थोडक्यात इतिहास
मराठी संकेतस्थळांच्या निर्मितीची सुरुवात साधारण १५ वर्षांपासून झाली. प्रत्यक्षात कॉम्प्युटरवर मराठी काम करण्याची सुरुवात त्या आधीच झाली होती. १९ व्या शतकाच्या शेवटच्या दशकामध्येच कॉम्प्युटरवर मराठीत काम करण्यासाठी ब-याच निरनिराळ्या सॉफ्टवेअर्सची निर्मिती झाली होती. यामध्ये श्रीलिपी, आकृती, कृतीदेव, एपीएस सॉफ्टवेअर्स सोबत शिवाजी, किरण, सुशा, सुलभ इ. फॉन्ट उपलब्ध होते.
या सॉफ्टवेअर्स अथवा फॉन्टचा वापर करुन मराठी काम करण्यामध्ये एक मोठा अडथळा होता तो म्हणजे आपण जर एखाद्या सॉफ्टवेअर्स अथवा फॉन्टचा वापर करुन मराठी काम केले असेल व जर आपण आपले काम दुस-या कॉम्प्युटरवर घेऊन जात असाल तर त्या दुस-या ठिकाणी देखील तोच सॉफ्टवेअर्स अथवा फॉन्ट असणे आवश्यक असे कारण त्याशिवाय आपणास त्या दुस-या कॉम्प्युटवर आपले मराठी काम दिसत नसे.
नंतर जेव्हा संकेतस्थळावर मराठीचा वापर करण्यात आला तेव्हा तोच अडथळा मोठ्याप्रमाणात जाणवू लागला तो म्हणजे संकेतस्थळावर वापरलेला मराठीचा फॉन्ट इतर कॉम्प्युटवर नसल्याने तिथे मराठी दिसत नसे. या अडचणीसाठी तेव्हा एकच पर्याय होता तो म्हणजे संकेतस्थळावर वापरलेला फॉन्ट संकेतस्थळावरच डाऊनलोड करण्यासाठी ठेवला जात असे व संकेतस्थळावरील मराठी व्यवस्थित दिसण्यासाठी तो फॉन्ट डाऊनलोड करुन त्या कॉम्प्युटरवर लोड केल्यानंतरच संकेतस्थळावरील मराठी दिसत असे.
परंतू अशाप्रकारे फॉन्ट डाऊनलोड करुन कॉम्प्युटरवर लोड करणे सर्वांनाच येत नसल्याने नंतरच्या काळामध्ये ' डायनॅमिक फॉन्टचा ' वापर करण्यात आला. या प्रणालीमध्ये जर एखाद्या संकेतस्थळावर डायनॅमिक फॉन्ट वापरला असेल तर ते संकेतस्थळ ज्या कॉम्प्युटवर पाहिले जात असेल तेथे संकेतस्थळावर वापरलेला मराठी फॉन्ट आपोआप लोड होत असे आणि संकेतस्थळावरील मराठी देखील व्यवस्थित दिसत असे. डायनॅमिक फॉन्ट प्रकारामध्ये देखिल एक अडचण अशी होती की जर एखाद्या डायनॅमिक फॉन्ट वापरलेल्या संकेतस्थळावरुन आपण मराठी टाईप केलेला मजकूर कॉपी करुन आपल्या कॉम्प्युटरमध्ये पेस्ट केल्यास नंतर मराठी दिसत नसे.
अशाप्रकारे इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये बनविलेल्या संकेतस्थळाची अडचण जगभरातील सर्वच भांषांमध्ये बनविलेल्या संकेतस्थळांना होती.ही अडचण दूर केली युनिकोड फॉन्टने. युनिकोड फॉन्ट ही सध्याची इंग्रजी व्यतिरिक्त इतर भाषेमध्ये संकेतस्थळ बनविण्याची अद्ययावत प्रणाली आहे.
आता आपण आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा थोडक्यात आढावा घेऊ.
आंतरजालावर उपलब्ध असलेली मराठी संकेतस्थळे
सचिन सखाराम पिळणकर
या
मराठी माणसाचा
स्तुत्य उपक्रम !
आपण जे चित्र पाहिले ते www.netshika.com या संकेत स्थळाचे होते. मी जेव्हा मराठी संकेतस्थळे शोधण्यास सुरुवात केली तेव्हा माझा बराच वेळ त्यात गेला. आणि शोधता-शोधता www.netshika.com हे मराठी संकेतस्थळ दिसले, त्यातील संग्रह संकेतस्थळांचा ह्या विभागात मी गेले तेव्हा A to Z मराठी संकेतस्थळांचा खजिनाच सापडला. आपल्या मराठी भाषेचा आंतरजालावर किती सुंदर प्रकारे उपयोग केला जात आहे या विचाराने मी अक्षरश: भारावून गेले. असंख्य लेखक आपले विचार लिहिताहेत, असंख्य वाचक ते वाचताहेत. सृजनाचा हा सोहळा पाहून माझे मन भरून गेले. आंतरजालावर ही मराठी संकेतस्थळे असल्याने जगभरातील लोक ती पाहू, वाचू शकत असतील. म्हणजे जागतिक स्तरावर मराठीने आंतरजालाच्या मदतीने मानाचे स्थान निर्माण केले आहे आणि सामाजिक स्तरावर मात्र तिची उपेक्षा शिक्षक-पालक-विद्यार्थी करताहेत आणि त्यांना याची काळजीच नाही. ‘मराठी माणूसच मराठी माणसाचे पाय खेचतो ’ असे जेव्हा मी ऐकायचे तेव्हा मला राग यायचा की मराठी भाषा आणि मराठी माणसाबद्दल असे का बोलले जाते? पण या प्रकल्पाच्या निमित्ताने ते थोडेसे पटल्यासारखेच वाटले.
ही मराठी संकेतस्थळे उपलब्ध करून दिल्याबद्दल ‘सचिन सखाराम पिळणकर’ यांचे आभार मानावे तितके कमीच आहेत. या मराठी संकेतस्थळांचा जर आपण दैनदिन अध्यापनात वापर केला तर खरच किती बरे होईल!
आपण या मराठी संकेतस्थळांचा
थोडक्यात
आढावा
घेऊ.
मराठी आणि इतिहास यांच्या अध्यापनामध्ये
आंतरजालावर
उपलब्ध
असलेली
पुढील
मराठी
संकेतस्थळे
आपल्याला
उपयोगात
आणता
येतील.
यात जिजाऊंची समग्र माहिती अतिशय सुंदररित्या दिलेली आहे.
यात कविवर्य कुसुमाग्रज म्हणजेच विष्णु वामन
शिरवाडकर
यांची
समग्र
माहिती
अतिशय
सुंदररित्या
दिलेली
आहे.
यात सावरकर यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या समग्र कार्याची तपशीलवार माहिती अतिशय सुंदररित्या दिलेली आहे.
महाकवी ग.दि.माडगुळकर यांचे समग्र साहित्य यांची तपशीलवार
माहिती
अतिशय
सुंदररित्या
दिलेली
आहे.
यात संत तुकाराम यांच्या जन्मापासून ते मृत्यूपर्यंत त्यांनी केलेल्या समग्र कार्याची तपशीलवार माहिती अतिशय सुंदररित्या दिलेली आहे.
राम गणेश गडकरी हे नाव नुसते उच्चारले तरी मराठी वाचकाला ‘गडकरी’नावाचे जग समोर दिसू लागते. यात राम
गणेश
गडकरींचे
समग्र
साहित्य
मोफत
उपलब्ध
असणार
आहे.
चं.प्र.देशपांडे
हा
अख्खाच्या
अख्खा
लेखक
इंटरनेटवर
उपलब्ध
आहे. चं. प्र. देशपांडे
हे
मराठीतले
चालू
घडीचे
अत्यंत
प्रयोगशील
आणि
बुद्धिवादी
नाटककार
आहेत.
पु.ल.देशपांडे
हा
अख्खाच्या
अख्खा
लेखक
इंटरनेटवर
उपलब्ध
आहे. त्यांचे मराठी साहित्यातले योगदान माहित नसलेला मराठी माणूस निराळाच असेल.यांचे समग्र साहित्य,
यांची तपशीलवार
माहिती
अतिशय
सुंदररित्या
दिलेली
आहे.
सुरेश भट
हे
मराठीतील
एक
सुप्रसिद्ध
कवी.
त्यांना
गझल
सम्राट
असे
मानाने
संबोधले
जाते.
आजच्या महाराष्ट्राचा
पाया
गेल्या
शतकात
घातला
गेला.
तेव्हा
महाराष्ट्राला
वळण
लावणा-यांमधे प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरेंचं नाव खूप वरचं आहे. यांच्या महान कार्याची समग्र
तपशीलवार
माहिती
येथे
मिळते.
दिलीप प्रभावळकर
या
सृजनशील
गुणी
कलाकाराचं
कर्तृत्त्व
आणि
त्यांच्या
व्यक्तिमत्वाचे
इतर
कलापैलू
यांची
माहिती
यात
आहे.
- आता यानंतर मराठी बरोबरच इतर विषयांच्या अध्यापनासाठी उपयुक्त आणि आपला सर्वांगीण विकास साधण्यासाठी उपयुक्त असलेली मराठी संकेतस्थळे लक्षात घेऊ .
हर्षद
खंदारे या मराठी तरुणाने निर्मिलेले हे मराठी संकेतस्थळ. शब्दांत सांगायचे झाले तर , “ मराठीमाती
हा
विषय एक खजाना आहे किंवा त्याला महासागराची उपमा देता येईल. भाषेच्या काठावरुन सागराच्या तळाशी आपण जितके खोल जाऊ
तेवढ्या प्रमाणात शब्द सामर्थ्याची आणि विविध माहितीची दौलत हाती लागेल, यावर माझा विश्वास आहे, आणि
माझी ही छोटीशी बुडी माझ्या इवल्याश्या मुठीत जे काही देईल ती मूठ तुमच्या समोर उघडी करतांना मला आनंद होत आहे ".
यात
मराठीतील दर्जेदार पुस्तकांची किंमतींसकट यादी दिलेली आहे.
स्वप्निल पवार या सतत भटकंतीवर असलेल्या मराठी तरुणाचे संकेतस्थळ. यात महाराष्ट्रातील सर्व ज्ञात-अज्ञात किल्ल्यांची माहिती सुंदर छायाचित्रासकट आहे. तिथे जायचे कसे, खाणे-राहणे यांची सोय यांची उत्तम माहिती दिलेली आहे.
सचिन सखाराम पिळणकर यांचे हे संकेतस्थळ. भूगोल,खगोल प्रेमिंनी यास निश्चितच भेट द्यावी.या संकेतस्थळांस महाराष्ट्र शासनाचे प्रथम पारितोषिक प्राप्त झाले आहे.
सचिन सखाराम पिळणकर यांचे हे संकेतस्थळ. संकेतस्थळ बनवण्याचे शास्त्रशुद्ध शिक्षण मिळते.
सचिन सखाराम पिळणकर यांचे हे संकेतस्थळ. संकेतस्थळांसाठी लागण्या-या सर्व आवश्यक गोष्टींची माहिती मिळते.
सर्व मराठी नव्या-जुन्या गीतांचा आस्वाद इथे घेता येतो.
पर्यावरण, साहित्य, प्राणीजगत, पर्यटन यांविषयी अप्रतिम माहिती मिळते.
डॉ.शाम व रत्ना अष्टेकर यांनी जगातील सर्व रोगांची माहिती व त्यावरील औषधे यांची माहिती सांगितली आहे. यांस राज्य मराठी विकास संस्थेतर्फे दिला जाणारा सर्वोत्कृष्ट मराठी संकेतस्थळ प्रथम पुरस्कार प्राप्त झालेला आहे.
संपूर्ण भारतातील पर्यटनस्थळांच्या दर्शनासाठी उपयुक्त भरगच्च माहितीचा खजिना.
मराठीतील सर्व प्रकारच्या साहित्यांच्या पुस्तकांची किंमतींसकट माहिती दिली आहे.
संपूर्ण भारतातील नकाशे मराठीतून मिळतात.
ज्यांना मराठीतून आत्मनिवेदन करण्याची आवड आहे,आणि आजूबाजूला घडण्या-या घटनांकडे दक्षतेने पाहून विचार करता येतो अशा लोकांसाठीच उपलब्ध.
आपले मराठी राजे, राण्या, संत, किल्ले, शिवकालीन शब्दार्थ, मोडीलिपी, शिवरायांची पत्रे यांची दुर्मिळ माहिती उपलब्ध.
महाराष्ट्राचा इतिहास, ग्रंथ, संत साहित्य, श्लोक, प्रार्थना आणि स्रोत, सण, उत्सव यांची तपशीलवार माहिती.
मराठी चित्रपट, नाटके, संगीत, दूरदर्शन यांची माहिती देणारे अग्रगण्य संकेतस्थळ.
सर्व मराठी नाटकांची समग्र माहिती उपलब्ध.
शालेय जीवन आणि शालेय वयातील समस्या, शालेय वयोगटातील मुलांसाठी लेखन करणारे लेखक श्री.राजीव तांबे. यांचे शालेय वयोगटाला वाहिलेले उत्तम संकेतस्थळ.
जागतिक पातळीवर मराठी भाषिकांना एकत्र आणणे, मराठी भाषा, संस्कृती यांची जपणूक करणे, व्यवसाय उद्योग धंद्यामध्ये मराठी माणसाला स्थान मिळवून देण्यास कार्यरत असलेली संस्था.
मराठी संस्कृती, परंपरा, मराठी भाषा, महाराष्ट्र, उत्तम मराठी व्यक्तिमत्त्व, आणि राज ठाकरे यांची सर्व माहिती,पक्ष घडामोडी यांची समग्र माहिती उपलब्ध आहे.
सर्व क्षेत्रांतील पारिभाषिक शब्दांची मराठीतून यादी.
मराठी अभ्यास केंद्र ही प्रत्येक क्षेत्रात मराठीला मानाचे स्थान मिळवून देण्यास सातत्याने कार्यरत असलेली संस्था आहे.
'मराठीचा विकास : महाराष्ट्राचा विकास' हे या राज्य मराठी विकास संस्थेचे बोधवाक्य आहे. त्यावरून संस्थेच्या व्यापक कार्यकक्षेची कल्पना येऊ शकेल. मराठी भाषेच्या प्रसारासाठी विविधांगी उपक्रम, चळवळ राबवणाऱी संस्था. दरवर्षी मराठी संकेतस्थळ स्पर्धा घेऊन आंतरजालावरील उत्तम मराठी संकेतस्थळे निवडून त्यांना पुरस्कार देते.
सारांश व शिफारसी
सारांश
२१ व्या शतकात आधुनिकीकरणामुळे तसेच विज्ञान तंत्रज्ञानातील प्रगतिमुळे जागतिक स्तरावर अनेक बदल घडून आले. संगणक आणि आंतरजालाच्या क्षेत्रात तर झपाट्यानेच विकास होत गेला.आज आंतरजालावर मराठी संकेतस्थळे खूप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध असून ती विविध, सखोल ज्ञानाने उपयुक्त अशी आहेत. मराठी संस्कृतीचा आणि थोर परंपरांचा अभिमान त्यातून सतत दरवळत असताना जाणवत आहे. जागतिक स्तरावर आंतरजालाच्या माध्यमाने मराठीने अत्यंत
मानाचे असे अढळ स्थान प्राप्त केले आहे.
या उलट सामाजिक आणि शालेय स्तरावर मात्र मराठीची उपेक्षा होत आहे हे काही आपल्याला नव्याने सांगायला नकोच! मराठीचे बालकाच्या सर्वांगीण विकासातील महत्त्व अनन्यसाधारण आहे हे आपण जाणतोच आहोत पण त्या दृष्टीने एक पालक व एक शिक्षक म्हणून याकडे दुर्लक्ष केले जात आहे.
एडगर डेल यांनी सांगितल्याप्रमाणे, " दृकश्राव्य अनुभूती अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अधिक रुचिपूर्ण व परिणामकारक बनवितात ". पण डी.एल.पी.ची सोय असलेल्या शाळांमध्येसुद्धा इतर विषयांच्या तुलनेत मराठी अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत दृक - श्राव्य अनुभूतींचा वापर न करता पारंपरिक नीरस पद्धतिंचाच वापर केला जात आहे हे दिसून येते. आणि याचा दुष्परिणाम बालकाच्या सर्वांगीण विकासावर होत असल्याचे दिसून येत आहे.
हे सर्व होऊ नये म्हणून आणि हे सर्व बदलायला हवे आहे म्हणून आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा अध्यापनामध्ये वापर केल्यास किंवा एक संदर्भ साधन म्हणून विद्यार्थ्यांना त्याची गोडी लावून दिल्यास निश्चितच आजचे बालक हे सर्वांगीण व्यक्तिमत्त्व विकास प्राप्त झालेले दिसून येईल आणि व्यक्ती – समाज – राज्य – राष्ट्र – जग यांचा विकास आपोआपच साधता येईल, अशी आशा मी करते.
शिफारसी
या प्रकल्पानंतर संशोधिकेला पुढील शिफारसी कराव्या वाटल्या.
१) आंतरजाल व संगणकाचे ज्ञान पालकांना - शिक्षकांना व विद्यार्थ्यांना दिल्यास त्यांची संगणकाचा एक संदर्भ साधन म्हणून उपयोग करण्यातील रूची उत्पन्न होईल.
२) पालकांना-शिक्षकांना व विद्यार्थ्यांना मराठी भाषेचे महत्त्व समजेल व मराठी भाषेविषयी अभिमान वाटेल.
३) शिक्षक-पालक-विद्यार्थी यांचा सर्वांगीण विकास साध्य होईल आणि ख-या अर्थाने जगाचा विकास लवकरच साधता येईल.
४) ख-या अर्थाने एडगर डेल यांच्या दृक - श्राव्य
अनुभूतींना
अध्ययन – अध्यापन प्रक्रियेत मानाचे स्थान प्राप्त होईल व ही प्रक्रिया अधिक रुचिपूर्ण व परिणामकारक होईल.
५) यातून सर्जनशीलतेचा विकास होऊन मराठी साहित्यविश्वात अजून नवनव्या साहित्य प्रकारांची भर पडेल.
संदर्भ सूची
१) संशोधन पद्धती शास्त्र व तंत्रे
डॉ.प्रदीप आगलावे.
२) शिक्षणातील संशोधन
प्रा.बंसी बिहारी पंडित.
३) मराठी आशय पद्धती
डॉ.अरविंद दुनाखे
४) आंतरजाल
धन्यवाद
No comments:
Post a Comment