Thursday, 13 December 2012


29 babies were born on Wednesday at Government Medical College Hospital


AURANGABAD: It was just another day at the Government Medical College Hospital (GMCH) when 29 babies were born, though the date was special. "The interesting part is that the male female ratio has been almost 50:50," said head of the department of obstetrics and gynaecology, Government Medical College Hospital, Kanan Yelikar.

Yelikar said that at GMCH of the 29 babies, 20 were normal deliveries and nine were born through Caesarean section.

This is a routine practice, said medical superintendent, Shivaji Shukre. "On an average 50 babies are delivered every day at GMCH," he added.

The women who delivered the babies were from rural and urban areas. "Today, among the total babies 15 are girls and 14 are boys. The positive sign that is being observed in these coming months is that the equal ratio of male and female child birth," she said. 

"I do not believe in any astrological dates. We don't allow a woman to risk her life or that of the baby simply to deliver on a fancy date. I personally believe that delivering a child is a divine process, which should not be interfered with unnecessarily," she added. 


बुधवारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये २९ बाळांनी जन्म घेतला.

औरंगाबाद :  बुधवारी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये २९ बाळांनी जन्म घेतला.गमेकॉहॉ (GMCH) साठी तसा हा नेहेमीप्रमाणेच दिवस होता पण तारीख विशेष होती. गमेकॉहॉमधील प्रसूति आणि स्त्री रोग विभागाच्या प्रमुख कानन येलिकर म्हणाल्या,“यातील महत्त्वाची आणि गंमतीदार बाब अशी की, स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर प्रमाण ५०:५०%  असे होते.

डॉ.कानन येलिकर म्हणाल्या,“ जन्मलेल्या २९ बाळांपैकी २० बाळांनी सामान्य विभागामध्ये तर ९ बाळांनी सीजेरियन विभागामध्ये जन्म घेतला.

(GMCH) चे चिकित्सा अधीक्षक, शिवाजी शुक्रे म्हणाले की, हा आमच्या रूटीनचाच एक भाग झाला आहे, GMCH मध्ये रोज ५० बाळांचा जन्म होतो.

बाळांना जन्म दिलेल्या महिला या शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही भागांतल्या आहेत. डॉ. येलिकर म्हणाल्या, "आज  सर्व बाळांमध्ये १५ मुली आहेत आणि १४ मुले असून ही समान स्त्री-पुरूष लिंग गुणोत्तर प्रमाणाची सकारात्मक बाजू वाटते. मी कोणत्याही ज्योतिषीय तिथींवर विश्वास ठेवत नाही. आम्ही कोणत्याही महिलेला त्यांना हव्या असलेल्या फॅन्सी तारखांना त्यांच्या बाळांना जन्म द्यायची परवानगी देत नाहीत. बाळांना जन्म देणे ही एक दिव्य प्रक्रिया आहे आणि त्यात आपण उगाचंच ढवळाढवळ करणे योग्य नाही.

Monday, 10 December 2012





शनिवार दि. 8 डिसेंबर 2012 रोजी http://bharat4india.com/ या नव्या वेबसाइटचे संपादक मंदार फणसे आमच्या भेटीला आले होते. टीव्ही अँकर आणि पत्रकार असलेले श्री. मंदार फणसे यांनी झी अल्फा न्यूज, एनडी टीव्ही, सीएनएन आयबीएन, आयबीएन लोकमत अशी 13 वर्षांची मुशाफिरी केलेली आहे. फणसे यांनी कोणत्याही चॅनलमध्ये न जाता,आय.बी.एन.-लोकमत सोडून गेलेल्या काही सहकारी आणि रिपोर्टरना हाताशी धरून हे इंटरनेट न्यूज चॅनल सुरू केले आहे.

मराठी अभ्यास केंद्राचा चौथा विद्यार्थी मेळावा २८ आणि २९ जानेवारी २०१२ रोजी मुंबई विद्यापीठाच्या बी. रोड चर्चगेट येथील शाहीर अमरशेख सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मराठी प्रसार माध्यमांची मराठी भाषेच्या प्रसारात काय भूमिका आहे आणि ती भूमिका प्रसारमाध्यमे पार पाडत आहेत का? या विषयावरील चर्चासत्रात ई टीव्हीचे राजेंद्र साठे व आयबीएन लोकमतचे मंदार फणसे ह्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

"भारत ४ इंडिया " ह्या इंटरनेट न्यूज चॅनलवर आपल्याला भारतातील बाजारभाव,संस्कृती,तसेच राजकीय आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींची माहिती मिळते.त्यांनी वेबकास्ट, एफ कॉमर्स बद्दल माहिती सांगितली. वेबकास्ट हे ब्रॉडकास्ट प्रमाणे आहे.एखादी घडलेली घटना ७ सेकंदांनंतर लगेच आपल्याला ईथे पाहायला मिळते.


http://timesofindia.indiatimes.com/city/aurangabad/Four-patients-admitted-to-govt-cancer-hospital/articleshow/17482608.cms

Four patients admitted to govt cancer hospital

AURANGABAD: The state-of-the-art cancerinstitute has admitted around four patients in last two days since it started the in-patients department on Saturday. "Most of the patients are from the rural areas suffering from different cancers," said Arvind Gaikwad , the officer on special duty at the cancer hospital.

The patients admitted to the cancer hospital are from Parbhani (1), Nanded (2) and Sillod (1). One patient is suffering from acute myeloid leukaemia (a type of cancer that affects the blood and bone marrow), another from pancreatic malignancy and the third one from ovarian malignancy. Another patient who was admitted on Tuesday is being examined.

चार रूग्णांना कॅन्सर हॉस्पिटल मध्ये भरती केले गेले.

औरंगाबाद : द स्टेट ऑफ आर्ट कॅन्सर इंस्टिट्युट मध्ये या शनिवार पासून सुरू केलेल्या विभागात मागील दोन दिवसांत चार रूग्णांना भरती केले गेले.कॅन्सर हॉस्पिटल मधील विशेष कार्यकारी अधिकारी  श्री.अरविंद गायकवाड म्हणाले की,"जास्तकरून ग्रामीण भागातील रूग्ण विविध प्रकारच्या कॅन्सरने पिडीत आहेत."



Wednesday, 5 December 2012

पाऊस अंतर्बाह्य

                                                        

                बाहेर आभाळ नुस्तंच भरून आलंय
कुंद भवताल, गरम वारा
सगळी साली घामाची चिकचिक !
मरगळ भरून राहिलीय सगळीकडे.
तगमग तगमग असह्य
तडफड उद्वेग चिडचिड
कशाचा राग, कशाचा संताप ?
काहीच कळत नाही.
काय करू मी ? काय करू ?
या घालमेलीतून मोकळं व्हायचंय मला
बाहेर ते आभाळ अन् आत हे मन
साले छळताहेत नुस्ते मला
मोठमोठ्याने ओरडावं, रडावं
पण भरवस्तीत ते अशक्य !
ही सततची जीवघेणी घालमेल….
ही अस्वस्थतेची टांगती तलवार….
मी कशाची वाट पाहतेय ?
काय आहे जे मिळाल्याशिवाय चैन पडत नाहीये ?
कोण आहे ते अनामिक ?
who ? who yaar …. damn it!
टप्प ….टप्प…. एक…. दोन…. टप्प…. तीन
परत  टप्प !
आणि असंख्य  टप …. टप …. टप …. टप !
बाहेर आभाळ टपकू लागलेलं !
हळूच एक झुळूक, पुन्हा झुळूक
पाहता ….पाहता….
अवघडलेलं सगळंच सैलावत जातं….
आणि मी भिजू लागते,
पावसांच्या धारांत
अंतर्बाह्य !









                                                                 -          प्रतिमा संजीवनी 
                                       हंस दिवाळीअंक २००९

Tuesday, 4 December 2012

मृगजळ






मला नं त्या आभाळाला

डिवचून  डिवचून

विचारावंसं वाटतं की,

" तुला आदि - मध्य - अंत कसा नाही रे ?

किती दिवस तू राहणारेस बाबा

असं चिरंतन मृगजळ बनून ? "



                               - प्रतिमा संजीवनी 




Wednesday, 28 November 2012

बी.ए़ड कृतीसंशोधन प्रकल्प ' आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणे - एक अभ्यास ' (भाग १)


नमस्कार,

मी सेकंडरी ट्रेनिंग कॉलेजमुं.१ येथून बी.ए़ड अभ्यासक्रम (२०११-१२) शिकत असताना आम्हाला अभ्यासक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या आवडीच्या एका विषयावर कृतीसंशोधन प्रकल्प करणे अनिवार्य असे. त्य़ामुळे मी   आंतरजालावर   उपलब्ध   असलेल्या   मराठी  संकेतस्थळांचा आढावा घेणे -  एक अभ्यास  ' ह्या माझ्या आवडत्या  विषयावर केलेला कृतीसंशोधन प्रकल्प इथे देत आहे.








अनुक्रमणिका
                              




प्रकरण 

प्रस्तावना


भाषा शब्द भाषया धातूपासून बनलेला आहे. ‘भाषयाचा मूळ अर्थ बोलणे. मनुष्य स्वत:चे भाव, विचार भाषेच्या माध्यमातून व्यक्त करतो.


भारतात अनेक भाषा बोलल्या जातात. प्रत्येक राष्ट्राची एक प्रमुख भाषा किंवा मातृभाषा असते. तशीच महाराष्ट्राची प्रमुख भाषा, मातृभाषा ही मराठी आहे.


मराठी भाषा विविधांगी पैलूंनी नटलेली आहे. तिला समृद्ध संस्कृती, साहित्य  वाड्मयाची जोड आहे. म्हणून मराठी भाषा इतर भाषांपेक्षा आपले वेगळपण दाखवते. महाराष्ट्रात मराठी भाषा ही लोकांच्या आत्मनिवेदनाचे तसेच बौद्धिक, भावनिक, सामाजिकसाहित्यिक, अध्यात्मिक विकासाचे म्हणजेच सर्वंगीण विकासाचे साधन म्हणून कार्य करते.


२१ व्या शतकात आधुनिकीकरणमुळे समाजात अनेक बदल घडून आले आहेत. मानवाने विज्ञान - तंत्रज्ञानाच्या जोरावर खूप मोठी प्रगती साधली आहे आणि साधतच राहणार आहे.


अशा वेळेस थोर परंपरांनी समृद्ध असलेल्या आपल्या मराठी भाषेचा आंतरजालावर किती प्रमाणात वापर होतो आहे?, किती मराठी संकेतस्थळे आज आंतरजालावर उपलब्ध आहेत आणि त्यांचा मराठी इतर विषयांच्या अध्यापनामध्ये आपण एक संदर्भ साधन म्हणून कसा वापर करू शकतो?, याचा अभ्यास करण्यासाठी मी हा विषय निवडला आहे.



गरज

सुरुवातीला मी मराठी भाषा अध्यापनामध्ये मराठी संकेतस्थळांचा वापर - एक अभ्यास असा विषय निवडला होता. पण डी.एल.पी ची सोय असलेल्या काही शाळांमध्येसुद्धा मराठी संकेतस्थळांचा एक संदर्भ साधन म्हणून अध्यापनात वापर करण्याचा विचार अजूनही सर्रास रुढ झालेला नाही आहे. याचशा मराठी अध्यापकांना संगणकाचे, आंतरजालाचे ज्ञान नाही. ते जाणून घेऊन - शिकून घेऊन  त्याचा अध्यापनात वापर करण्याची सवड नाही आणि आवड तर नाहीच नाही, असे मी काही शिक्षकांशी संवाद साधल्यानंतर मला जाणवले.


बऱ्याच ठिकाणी पारंपरिक पद्धतीचे कंटाळवाणे अध्यापनच केले जात आहे. मराठीच्या तुलनेत इतर विषयाच्या निमेटेड सी.डी., डी.वि.डी. सुद्धा उपलब्ध आहेत. पण मराठी विषयाला या दृश्राव्य अनुभूतिंचा स्पर्शही झालेला दिसत नाही आहे. आणि म्हणूनच मराठी ही आपली मातृभाषा असून पालकांना-विद्यार्थ्यांना तिचा अभिमान नाही. विद्यार्थ्यांना आपल्याच मराठी मातृभाषेतून सुंदर पत्र, निबंध लिहिता येत नाहीत. मराठी विषयात कमी गुण मिळतात. शुद्धलेखन लिहायला देऊनही असंख्य मराठी व्याकरणिक चूका केलेल्या दिसतात. 'ना आपले बोलणे शुद्ध, ना आपले लिहिणे शुद्ध !' अशी खेदजन्य परिस्थिती मराठीच्या वाट्याला आलेली आहे. आणि त्यामुळे आज आपल्या मराठी माणसाचा सर्वांगीण विकास घडणे आणि घडवणे ही अशक्यप्राय: वस्तुस्थिती बनलेली आहे.


आंतरजालावर मराठीचा मोठ्या प्रमाणावर वापर होत असताना, मराठी संकेतस्थळांच्या माध्यमातून मराठी भाषा मराठी संस्कृती जगभर पोहोचलेली असताना त्यांचा मराठी इतर विषय अध्यापनात वापर होत नाही ही खूपच चूकीची शरमेची बाब आहे. मग अशावेळेस एडगर डेल यांनी सांगितलेल्या दृश्राव्य अनुभूतींना काय महत्त्व उरते?

      
आंतरजालावर अलिबाबाच्या गुहेप्रमाणे असंख्यविविध आणि समृद्ध अशा मराठी संकेतस्थळांचा खजिनाच दडलेला आहे. त्याची माहिती आपल्याला व्हावी, मराठी बरोबरच इतर विषयांच्या अध्यापनात त्यांचा वापर केला जावा आणि एडगर डेल यांनी सांगितल्याप्रमाणे दृ-श्राव्य अनुभूती देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया -या अर्थाने अधिक रुचिपूर्ण, नाविन्यपूर्ण आणि परिणामकारक व्हावी यासाठी या प्रकल्पाची गरज भासते.



समस्येचे     विधान

१)  स्थूल समस्या

मराठी संकेतस्थळांचा आढावा घेणे.

) निश्चित समस्या
'आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेत स्थळांचा आढावा घेणे - एक अभ्यास.'


महत्त्व

ü    मराठी  भाषेविषयी  लोकांना  प्रेम  वाटावे.

ü    मराठी   भाषेची  आवड   निर्माण   व्हावी.

ü    मराठी  भाषेचे  महत्त्व  सर्वांना  ळावे.

ü    मराठी   भाषेबद्दल   सखोल  ज्ञान   प्राप्त  व्हावे.

ü    आंतरजालावरील    मराठी   संकेतस्थळांचा  अध्यापनात वापर केला  जावा.

ü    विद्यार्थ्यांना  या  मराठी  संकेतस्थळांवरील  ज्ञानाचा  खजिना   मनमुराद  लुटता  यावा.

ü    विद्यार्थ्यांमधील सर्जनशीलता, कल्पनाशक्ती, प्रतिभा जागृत होऊन मराठी साहित्यविश्वात त्यांनी मोलाची भर घालावी.

ü    स्वत:चा सर्वांगीण विकास साधता-साधताच मराठी भाषेचे संपूर्ण जगभरात एक अढळ स्थान निर्माण करण्यास मदत करावी.

अशाप्रकारे ह्या प्रकल्पाचे महत्त्व मला वाटते.


उद्दिष्टे

  • आंतरजालावरील उपलब्ध मराठी संकेतस्थळांचे ज्ञान मिळवण्यासाठी  मदत  करणे.
  • एक संदर्भ साधन म्हणून आंतरजालावरील मराठी संकेतस्थळांचा   अध्यापनात   वापर  करण्यासाठी मदत करणे.
  • एडगर  डेल यांनी सांगितल्याप्रमाणे  दृश्राव्य अनुभूती देऊन अध्ययन-अध्यापन प्रक्रिया परिणामकारक बनविण्यासाठी  मदत  करणे.

गृहितके

  •  मराठीचे  आपल्या  जीवनातील महत्त्व, गरज फायदे कोणते आहेत हे पटवून दिले तर निश्चितच मराठीविषयीचा  दृष्टिकोण  सकारात्मक  होईल.   
  •  मराठी  भाषेविषयी  आस्था, प्रेम  उत्पन्न होईल.
  • मराठी    इतर  विषय  अध्यापनात  मराठी  संकेतस्थळांचा   वापर   केला   जाईल.
  •  पालक शिक्षक विद्यार्थी  यांना  आंतरजालावरील मराठी  संकेतस्थळांचे  ज्ञान  होऊन   त्यांचा  सर्वांगीण  विकास साधला  जाईल.


व्याप्ती   व    मर्यादा

व्याप्ती

महाराष्ट्रात सर्वत्र मराठी भाषा बोलली जाते कारण महाराष्ट्राची मातृभाषा मराठी आहे. संपूर्ण जगामधे आंतरजालावर आणि   संगणकीय  क्षेत्रात  मराठीचा   वापर   मोठ्या  प्रमाणावर केला   जात  आहे.

अशाप्रकारे  मराठी   भाषेची  व्याप्ती  ही  फार  मोठी आहे.

मर्यादा

हा प्रकल्प सर्वच स्तरावरील मराठी शिक्षकांना विद्यार्थ्यांना   पालकांना    प्रत्येक   मराठी   माणसाला उपयुक्त  आहे.

एकंदरीतच   मराठी  भाषेविषयी    अभिरुची    आणि    प्रेम  असणा-या   सर्वांसाठी   आहे.



प्रकरण 
प्रकल्पाची कार्यवाही

वापरलेली पद्धत

संशोधन
   
व्याख्या


  • रेड्मन  :  नवीन ज्ञान प्राप्त करण्यासाठी केलेला  सुव्यवस्थित  प्रयत्न म्हणजे संशोधन.


  • वेबस्टन :  संशोधन म्हणजे तथ्येत्त्वे शोधण्यासाठी करण्यात येणारी चिकित्सा होय.


  • मौले   : समस्यांची शास्त्रशुद्ध पद्धतीने कुशलतेने उत्तरे शोधणे म्हणजे संशोधन होय.

संशोधनाचे हेतू 


  • समस्येचे उत्तर शोधणे.

  • संशोधन हे तर्कसंगत वस्तुनिष्ठ असून जमा केलेल्या सामग्रीचा पड़ताळा चाचणी करून पाहिला जातो.

  • प्रमाणित साधनांचा वापर होतो.
  • संशोधनामध्ये असलेली माहिती संख्यात्मक स्वरूपात मिते.
  •  निष्कर्ष काढण्याचा प्रयत्न केला जातो.



संशोधनाचे प्रकार

संशोधन

  • मूलभूत संशोधन : - ज्ञान प्राप्तीसाठी प्राप्त केले जाते.  उदा.न्यूटनचा सिद्धांत

  • उपयोजित संशोधन : - समस्येची ताबडतोब उत्तरे शोधणेउदा.२६ जुलैला पाऊस  का पडला? याची कारणे.

  • कृती संशोधन    : - शिक्षकाला आपले जीवन व्यतीत करत असताना अनेक समस्या निर्माण होतात(उदा. विद्यार्थ्यांच्या अध्ययनाबाबतीत ) याचे निराकरण याद्वारे केले जाते.

संशोधन पद्धती

* संशोधनाच्या पद्धती खालीलप्रमाणे *


ऐतिहासिक पद्धती

सर्वेक्षण पद्धती
         
प्रायोगिक पद्धती
                       
व्यक्ती अभ्यास पद्धती
                      
वैकासिक पद्धती
                      
)  कारणमिमांसा पद्धती
                       
समवाय पद्धती

* यांपैकी पहिल्या तीन पद्धती संशोधनाच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत. *




ऐतिहासिक पद्धती

शिक्षणामधील विविध वर्तमान समस्यांच्या निराकरणासाठी त्यांची पार्श्वभूमी स्पष्ट होण्याच्या दृष्टीने ऐतिहासिक संशोधन महत्त्वाचे आहेऐतिहासिक घटना किंवा सध्याच्या साधनांची भूतकाळातील चौकशी करण्यासाठी ऐतिहासिक पद्धती वापरतात.

सर्वेक्षण पद्धती

सध्याची स्थिती छोटया नमुन्यावरून शोधण्यासाठी सर्वेक्षण संशोधन वापरतात.

प्रायोगिक पद्धती

कार्यकारण संबंध दर्शविणा-या गृहीतकांचे खरेखुरे परिक्षण करण्याची एकमेव पद्धती म्हणजे प्रायोगिक पद्धती होयही भविष्यात रमणाऱी शास्त्रीय पद्धती आहे. त्यामध्ये संशोधक नैसर्गिक गोष्टींवरून किंवा स्वत: प्रयोग करून आवश्यक ती माहिती उपलब्ध करतो.





निवडलेली पद्धती

सर्वेक्षण  पद्धती 

  
(ऐतिहासिक पद्धतीने भूतकालीन गोष्टींविषयी माहिती गोळा करण्यात येत असल्याने वर्णनात्मक आणि जमा केलेल्या सर्व साहित्याची आपोआप स्वीकृती करता येत नाहीसंशोधन हे भूतकाळात उपस्थित नसल्यामुळे संकलित साहित्याच्या स्वीकृतीबाबतीत दोन महत्त्वाच्या गोष्टींची दखल घ्यावी लागते.)

  
सर्वेक्षण संशोधनात संशोधकास माहिती कोठून उपलब्ध झाली ते जातीने माहित असल्यामुळे त्याच्या मान्यतेविषयी विश्वसनीयतेबाबत आणि सप्रमाणता मान्य करण्यास अडचणी नसतातत्याबाबत शंका आल्यास ताबडतोब निरसन करून घेण्याची शक्यता असते.


सदर प्रकल्पासाठी संशोधिकेने सर्वेक्षण पद्धती वापरली आहेया सर्वेक्षणात आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेऊन त्यामधील समस्यांचा उहापोह केला आहेम्हणून ही माहिती या सर्वेक्षणाअंतर्गत विश्वसनीय आहे.


सर्वेक्षण  पद्धती 
( सविस्तर माहिती )

' सर्वेक्षण पद्धती ' ही आदर्शमूलक सर्वेक्षण स्तर आणि वर्णनात्मक पद्धती अशा विविध नावांनी प्रचलित आहे. "सर्वेक्षण म्हणजे प्रचलित तथ्यांचे संकलन, वर्णन, स्पष्टीकरण मुल्यांकन होय."

      
विविध क्षेत्रांतील वर्तमान स्थितीचा अंदाज घेणेसंस्था नियोजनाकरिता आवश्यक ती माहिती गोळा करणे आणि उच्च संशोधनात समस्येची उकल करण्याकरिता आवश्यक असलेली वर्तमान स्थिती समजू घेणेयासाठी सर्वेक्षण केले जाते.


सर्वेक्षणातून ) वर्तमान स्थिती, ) अपेक्षित स्थिती, ) आवश्यक संशोधनाचा बोध अशा तीन प्रकारची माहिती संकलित केली जाते. 



सर्वेक्षणाचा हेतू


सर्वेक्षणाचा प्रमुख हेतू विभिन्न क्षेत्रांतील वर्तमान स्थितीचा बोध घेणे हा आहेयातून होणा-या प्राप्त तथ्यांचे मुल्यांकन अधिक चांगल्या बदलाकरिता मार्गदर्शन करते. अभ्यासक्रमाशी संबंधित असलेले सर्वेक्षण निव्व प्रचलित अभ्यासक्रमात आढळून येणारे गुण-दोष पाहून थांबत नाही तर त्यात सुधारणाही सुचविते.

संशोधन कर्त्याला अधिक वस्तुनिष्ठ पद्धतीने संशोधन करून समस्येची उकल करण्याकरिता लागणारी परिस्थिती समजू घेण्यासाठी प्रारंभिक पायरी म्हणून सर्वेक्षणाचा उपयोग केला जातो. प्रयोगाची आखणी अंमलबजावणी करण्यासाठी आधारभूत असलेल्या वर्तमान परिस्थितीचे सत्य आकलन यामुळे संशोधकाला होते.प्राप्त होण्यासारख्या पुराव्यांच्या आधारे समस्येची उकल होऊ शकते की नाही हे ते.

विविध  शालेय उपक्रमांचे नियोजन करण्यात सर्वेक्षणाची मदत होतेसर्वेक्षणामुळे विकासाची कोणती क्षेत्रे उपलब्ध आहेत ते ते.



नमुना निवड

पद्धती आणि तंत्र विकसित करताना संशोधकाला उपयुक्त पडेल असा नमुना ठरविणे आवश्यक असते. कोणत्याही सर्वेक्षण पद्धतीच्या समस्यांचा शोध घेताना एक प्रातिनिधिक नमुना निवडावा लागतो.

व्याख्या :
संशोधनाची तत्त्वे पद्धती विकसित करताना आवश्यक असा उचित नमुना गट ठरविण्याच्या पद्धतीला नमुना निवड असे म्हणतात.

* या प्रकल्पाकरिता संशोधिकेने आंतरजालावर उपलब्ध असलेल्या मराठी संकेतस्थळांचा नमुना म्हणून निवड केली  या मराठी संकेतस्थळांचा आढावा घेऊन हा प्रकल्प तयार करण्यात आला. *