Monday, 10 December 2012





शनिवार दि. 8 डिसेंबर 2012 रोजी http://bharat4india.com/ या नव्या वेबसाइटचे संपादक मंदार फणसे आमच्या भेटीला आले होते. टीव्ही अँकर आणि पत्रकार असलेले श्री. मंदार फणसे यांनी झी अल्फा न्यूज, एनडी टीव्ही, सीएनएन आयबीएन, आयबीएन लोकमत अशी 13 वर्षांची मुशाफिरी केलेली आहे. फणसे यांनी कोणत्याही चॅनलमध्ये न जाता,आय.बी.एन.-लोकमत सोडून गेलेल्या काही सहकारी आणि रिपोर्टरना हाताशी धरून हे इंटरनेट न्यूज चॅनल सुरू केले आहे.

मराठी अभ्यास केंद्राचा चौथा विद्यार्थी मेळावा २८ आणि २९ जानेवारी २०१२ रोजी मुंबई विद्यापीठाच्या बी. रोड चर्चगेट येथील शाहीर अमरशेख सभागृहात आयोजित करण्यात आला होता. तेव्हा मराठी प्रसार माध्यमांची मराठी भाषेच्या प्रसारात काय भूमिका आहे आणि ती भूमिका प्रसारमाध्यमे पार पाडत आहेत का? या विषयावरील चर्चासत्रात ई टीव्हीचे राजेंद्र साठे व आयबीएन लोकमतचे मंदार फणसे ह्या मान्यवरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले होते.

"भारत ४ इंडिया " ह्या इंटरनेट न्यूज चॅनलवर आपल्याला भारतातील बाजारभाव,संस्कृती,तसेच राजकीय आणि विविध क्षेत्रांतील घडामोडींची माहिती मिळते.त्यांनी वेबकास्ट, एफ कॉमर्स बद्दल माहिती सांगितली. वेबकास्ट हे ब्रॉडकास्ट प्रमाणे आहे.एखादी घडलेली घटना ७ सेकंदांनंतर लगेच आपल्याला ईथे पाहायला मिळते.


No comments:

Post a Comment