Wednesday, 9 January 2013

सकाळ फुड फेस्टिवल सोबत खा,प्या आणि ऐश करा.




औरंगाबाद- मंगळवारी ८ जानेवारी २०१३ रोजी सकाळ फुड फेस्टिव्हलचे उद्घाटन जालना रोडवरील एसएफएस ग्राउंडवर दणक्यात करण्यात आले.मस्त गुलाबी थंडी,शॉल-स्वेटरचा उबदारपणा,तोंडाला पाणी आणणारे चटपटीत, खमंग, गोड पदार्थ आणि मनसोक्त शॉपिंग हे सगळं एकाच ठिकाणी करण्याची संधी या फूड फेस्टीव्हलमध्ये मराठवाडियांना मिळाली.
सकाळ'तर्फे गेल्या अनेक वर्षांपासून करण्यात येणारे फूड फेस्टीवलचे आयोजन म्हणजे दर्दी खवय्यांसाठी पर्वणीच आहे 



काय काय खाल ?

हुरडा, मिसळपाव, गरम चकली, मक्‍याचे पदार्थ, मसाला पापड, पॉपकॉर्न, चाट, भेळ, बेकरीची उत्पादने, राजस्थानी थाळी, राजस्थानी चाट, मुगाचा शीरा, मुगाचे भजे, थालिपीठ आदी पदार्थांसह मसाला दूध, आईस्क्रीम, झुका भाकरी,  वडा पाव, रोल हाऊस, साबुदाना वडा ,बिर्याणी, चायनीज, इराणी मांसाहारी पदार्थ......अममम तोंडाला पाणी सुटलं न ?





तेव्हा जरूर या आणि सकाळ फुड फेस्टिवल सोबत खा,प्या आणि ऐश करा.


http://online2.esakal.com/esakal/20130109/5458125847476192085.htm



No comments:

Post a Comment