Thursday, 24 January 2013

फेसबुकवर जमलेल्या लग्नाची आदर्श गोष्ट

          

औरंगाबाद- (सोमवार दि.२१ जानेवारी २०१३) मुंबईतल्या उल्हासनगरची रिना तर औरंगाबादचा अजित यांची ओळख फेसबुकवर झाली.चॅटिंग करताना प्रेमात पडलेल्या या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि मराठवाड्यातील दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन अवघ्या २०० रूपयांत लग्नाचा बार उडवला.

उल्हासनगर येथे नोकरी करणारी रिना अजितच्या लांबच्या नात्यातलीच निघाली.सिल्लोड तालुक्यातील उंडणगावचे रहिवासी जगन पाटील अजितचे वडील यांनी ही अत्यंत अल्प खर्चात लग्न करण्याची आदर्श कल्पना सुचवली व त्याला सर्वांनीच मान्यता दिली.

नवरदेवाचे व नवरीचे कपडे जुनेच,आंतरपाटासाठी घरातला रूमाल,प्लॅस्टीकचे हार आणि चहापान ईतकीच ती लग्नाची तयारी !

प्रचंड दुष्काळाने करपलेल्या मराठवाड्यात असं आदर्श पद्धतीने लग्न करून दाखवून या जोडप्याने अति डामडौल,थाटामाटात लग्न करून पाण्यासारखा पैसा उधळणा-यांसमोर एक वेगळाच व अतिशय कौतुकास्पद आदर्शच घालून दिलेला आहे.

http://zeenews.india.com/marathi/news/ 

No comments:

Post a Comment