Tuesday, 22 January 2013

मटका आधार


                    


लातूर- शहराच्या ठिकाणी सुरू असलेल्या मटक्याने ग्रामीण भागातही कधीच आपले बस्तान बसवले आहे. ग्रामीण भागातील मटका एजंट आणि मटकाप्लेयर यांना पोलिसांचाच आधार असून पोलिस मात्र याबाबत अनभिज्ञ असल्याचे दाखवून कुठे सुरू आहे मटका?” असं विचारून आम्हाला दाखवा आम्ही कारवाई करतो”, असं सांगत आहेत.

येथे कल्याण (दिवसा) व मुंबई (रात्री) अश्या दोन प्रकारचा प्रकारे मटका खेळला जातो, मटका एजंटशी फोनवर बोलून आकडे लावले जातात त्यांना भेटून रक्कम देण्यासाठी वा जिंकलेली रक्कम घेण्यासाठी त्या-त्या गावात मध्यरात्रीपर्यंत अशा गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचा मुक्काम असल्याने साहजिकच चोरी व गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे.

दिवसागणिक मटका एजंटची संख्या वाढत असून काही उघड तर काही छुपेपणाने हा धंदा करत आहेत.या मटक्याला पोलिसांचाच आधार असल्याने तेवढ्यापुरतं बंद केल्याचे दाखवून पुन्हा काही दिवसांत ब-याच मटका दुकांनाची संख्या सुरू होते,असे गावक-यांचे म्हणणे आहे.ऐन दुष्काळात असा प्रकार सुरू असल्याने सर्वांच्याच तोंडाला फेस आलेला आहे.

श्रीकृष्ण कोकाटे,अपर पोलिस अधीक्षक,लातूर यांचे म्हणणे असे आहे की,

कोणत्या ठिकाणी व कोण मटका घेत आहे ? ”, याची माहिती  लोकांनी धीटपणे दिल्यास लगेच कारवाई केली जाईल.

http://online2.esakal.com/esakal/20130121/4952988539587474214.htm

No comments:

Post a Comment