Monday, 8 April 2013

काही बोलायाचे आहे...




समजा दोन व्यक्तिंमध्ये काही गैरसमज झाले तर ते समजूतीने दूर करायला हवेत...आपण चार पावसाळे जास्त पाहिले म्हणजे आपल्याला लोकांना (आपल्या समजूतीप्रमाणे वाटेल तेव्हा आणि वाट्टेल तसे) सल्ले देण्याचे लायसन मिळाले आहे..असे आपण का समजून चालतो??

कोणालाही प्रेमाने, आपुलकीने चार गोष्टी सांगितल्या..त्या चार गोष्टी सांगताना समोरच्याची बाजू त्याच्या ठिकाणी पोहचून positively विचार करून पाहिली...तर आपण केलेले सल्ले देण्याचे काम कदाचित य़ोग्य असेल, असे आपण समजून चालायला लागलो तर एकवेळ ठीक..पण आपण दिलेला सल्ला समोरच्या व्यक्तीने ऐकून आचरणात आणायलाच हवा अशी अपेक्षा आपण करू नये...


कारण बदलत्या ऋतूमानाप्रमाणेच उन्हाळे, पावसाळे, हिवाळेसुद्धा बदलत आलेले आहेत आणि ते असेच इथून पुढे बदलतच राहणार आहेत...त्यामुळे आपण जास्त पाहिलेल्या चार पावसाळ्यांमध्ये आणि समोरच्याने पाहिलेल्या काही पावसाळ्यांमध्ये काहीतरी फरक हा निश्चितच असतो हे ही आपण समजून चाललो तर ठीकच,नाही का??

 
                                       आपलीच प्रतिमा..