Thursday, 7 February 2013

क्षुल्लक कारणावरून भारतीय जवानाने भावी पत्नीला जिवंत जाळले: कुंपणानेच खाल्ले शेत





औरंगाबाद - लग्नाचे कपडे खरेदी करण्यावरून झालेल्या क्षुल्लक कारणावरून भावी पत्नीला जिवंत जाळण्याचे भयंकर अमानुष कृत्य भारतीय सैन्यदलातल्या जवानाने केले आहे. ह्या  अमानुष प्रकाराला कुंपणानेच खाल्ले शेत असेच म्हणावे लागेल.

सचिन हनुमंते या भावी जोडीदाराने १४ फेब्रुवारी व्हॅलेनटाईन डे रोजी होणा-या आपल्या लग्नाचे कपडे खरेदी करण्यासाठी आपल्या भावी पत्नीला हळद लागण्यापूर्वी आपल्या बहिणीच्या घरी बोलावले होते. तिथे कपडे खरेदीच्या क्षुल्लक कारणावरून या दोघांत झालेल्या वादाने भडकून या जवानाने भावी पत्नीच्या अंगावर रॉकेल टाकून तिला जिवंत जाळले.या भयानक प्रकारात ती तरूणी ८०% भाजली असून तिची प्रकृती अतिशय गंभीर आहे.

ज्या जवानांच्या हाती देशाच्या सुरक्षिततेचे सुकाणू असते त्याच जवानाने असे कृत्य करणे याला काय म्हणावे ??